*खारेपाटण येथील भूस्खलन झालेल्या भागाला आमदार नितेश राणे यांनी दिली भेट*
*त्या कुटुंबांचे लवकरच पुनर्वसन करण्यात येणार; आमदार राणे यांनी दिले आश्वासन
कणकवली;
खारेपाटण येथील भोरपी गोपाळ समाज बांधव राहत असलेल्या डोंगर भागातील वस्तीत नुकतेच भूस्खलन झाले होते. त्या भागाची पाहणी करण्या करिता आमदार नितेश राणे यांनी खारेपाटणला भेट दिली. व येथील नागरिकांचे लवकरच नविन जागेत पुनर्वसन करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे,खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर,नडगिवे सरपंच माधवी मण्यार,भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते शरद कर्ले, माजी जि.प.सदस्य रवींद्र जठार,खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव, नडगिवे उपसरपंच भूषण कांबळे, खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत, नडगीवे माजी सरपंच मण्यार, भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर, माजी पं.स सदस्य तृप्ती माळवदे तसेच सर्कल श्रीम बावलेकर,तलाठी श्रीम अरुणा जयानावर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण येथील भोरपी गोपाळ समाज राहत असलेल्या तावडेवाडीत भूस्खलन होऊन येथील घरांच्या जमीन भगाला भेगा गेल्या होत्या तर काही दरड भाग कोसळला होता. यामुळे येथील ५ घरातील ६ कुटुंबाची एकूण ३३ माणसे भयभीत झाली होती. जिल्हा प्रशासन व खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने या नागरिकांची तात्पुरती दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आज आमदार नितेश राणे यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून येथील नागरिकांची भेट घेतली व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले.
यावेळी आमदार नितेश राणे यांनी स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपंचायत तसेच कणकवली तहसीलदार आणि त्यांचे प्रशसान सहकारी यांनी तत्परता दाखवून येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले बद्दल त्यांचे अभीनंदन केले. तर या नागरिकांचे लवकरच प्रशासनाच्या वतीने सुरक्षित जागेत पुनर्वसन करन्यात येईल व पक्की घरे बांधून देण्यात येथील असे सांगितले.मात्र स्थानिक ग्रामपंचायतीने भूखंड उपलब्ध करून लवकरात लवकर कागदपत्रे पूर्ण करून दिली तर या लोकांना लवकरच नवीन घरे बांधून देवू असे सांगितले.











