रोणापालमध्ये एसटीच्या चाकाखाली पाय गेल्याने दुचाकीस्वार जखमी

बांदा l प्रतिनिधी :रोणापाल माऊली मंदिर समोरील वळणावर एसटी व दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात पाडलोस-भाकरवाडी येथील गणेश भिकाजी गावडे (२५) हा युवक गंभीर जखमी झाला. त्याच्या पायावरून एसटीचे चाक गेल्याने पायाला गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिकांनी त्याला तातडीने गोवा बांबोळी येथील रुग्णालयात हलविले आहे. रोणापाल पोलीस पाटील सौ. निर्जरा परब यांनी बांदा पोलिसांना अपघाताची माहिती दिली. बांदा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. हा अपघात आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडला.