गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने होतेय मागणी
कणकवली : तालुक्यातील हळवल फाट्यावर अनेक वेळा अपघात झालेले आहेत. त्यात काहींनी आपला जीव देखील गमावला आहे, असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात चाकरमानीवर्ग दाखल झालेला आहे. तसेच अपघात होऊ नये यासाठी प्रशासनाने आणि यंत्रणेने खबरदारी घेणे गरजेचे आहे. कणकवली तालुक्यात ट्रिपल सीट फिरणाऱ्यांची संख्या देखिल दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस देखील पडत असल्याने पोलीस यंत्रणेने योग्य ती खबरदारी घेणे घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक अमित यादव बाबतची दखल घेऊन यंत्रणा तैनात करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











