राजापूर (वार्ताहर): जी २० च्या व्यासपीठावर आपली कला सादर करण्यास मिळणे हे आपले परम भाग्य असल्याची भावना येथील राजापूर हायस्कुलचे संगीत शिक्षक उमाशंकर दाते यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या ऑर्गनच्या सुरांनी दिल्ली येथे जी २० जागतीक परिषदेमध्ये उपस्थीतांना मंत्रमुगध करणाऱ्या तालुक्यातील आडिवरे येथील ऑर्गनचे निर्माते आणि येथील राजापूर हायस्कुलमधील संगीत शिक्षक उमाशंकर तथा बाळ दाते यांचा राजापूर हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक जगदीश भालशंकर यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
श्री. दाते यांनी यांनी दिल्ली येथे जी २० परिषदेच्या वेळी संगीत नाटक अकादमी आणि नॅशलन अकॅडमी ऑफ परफॉर्मिग आर्स यांच्या विद्यमाने आयोजित भारतीय वादयांची ओळख आणि समृद्ध वारसा जगासमोर यावा या हेतुने भारतीय वाद्य वादन सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला जी २० समुहातील देश, ५० हुन अधिक देशांचे पंतप्रधान, अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात उमाशंकर दाते यांनी आपल्या खास शैलीत ऑर्गन वाजवुन सर्व देशांची मने जिंकली होती.
यानिमित्ताने श्री. दाते यांचा जगदिश भालशंकर यांच्या हस्ते शाल, श्रीफल, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तर याचवेळी लालुकास्तरावर विजेत्या खो-खो संघाचा तसेच बुध्दीबळ क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर प्राविण्य मिळविलेल्या कु. मृणाल कुंभार यांचा श्री. भालशंकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राजापूर हायस्कुलच्या क्रीडांगणावर नुकताच हा सत्कार समारंभ पार पडला.
यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक अरुण पोवार, पर्यवेक्षक मधुकर तोडकर,श्री. घागरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी उपस्थीत होते.












