सत्कोंडी अंगणवाडी येथे राष्ट्रीय पोषण अभियाना अंतर्गत विशेष उपक्रम

सत्कोंडी अंगणवाडी येथे राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीचे वॉर्ड सदस्य अजय काताळे, अरुण मोर्ये, ममता बंडबे, निकीता शिगवण, समिक्षा घाटे, मुख्याध्यापक पालये सर , अंगणवाडी सेविका चित्रा बैकर, आशा सेविका खापले, सीआरपी संगिता मोर्ये, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी वेगवेगळ्या रानभाज्या, पालेभाज्या, भाकऱ्या, मोदक, अशा विविध प्रकारच्या पोषक आहाराची पाककृती स्पर्धा घेण्यात आली यामध्ये प्रथम क्रमांक समिक्षा घाटे, द्वितीय क्रमांक ममता बंडबे, तृतीय क्रमांक स्मिता बंडबे यांना मिळाला.

मुख्याध्यापक पालये सर व अरूण मोर्ये यांनी मार्गदर्शन केले तर अंगणवाडी सेविका चित्रा बैकर यांनी सूत्रसंचालन केले.