संजय राऊत आणि अंबादास दानवे हे दोघे विधानसभा अध्यक्षांवर दबाव टाकतायत – आ. नितेश राणे
कणकवली : विधानसभा सचिवांना राज्यसभा खासदार संजय राजाराम राऊत आणि विरोधी पक्ष नेते, आमदार अंबादास दानवे या दोघांविरोधात विधानसभा नियम २७४ नुसार हक्क भंग प्रस्ताव पाठवला असून तो त्यांनी स्वीकारावा असे आमदार नितेश राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. संजय राऊत आणि अंबादास दानवे हे दोघे आणि उबाठा सेनेचे अन्य नेते ज्या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांवर दबाव टाकतायत, त्यांच्यावर टीका करताय, त्यांच्यावर अपशब्द, वापरत आहेत, त्यांचा इतिहास काढण्याची भाषा करत आहेत. या सगळ्या गोष्टी विधानसभेच्या नियमांचे भंग करणारे आहेत. काही दिवसांपूर्वी सांगितल्याप्रमाणे विधानसभेचे अध्यक्ष हे कस्टोरीयन ऑफ द हाऊस आहेत, प्रमुख आहेत, सर्वेसर्वा आहेत. न्यायालयाने, उच्च न्यायालयाने आणि सुप्रीम कोर्टने जी काही जबाबदारी त्यांच्यावर टाकली आहे. सत्ता स्थापनेची जी काही केस त्यांच्यासमोर चालणार आहे. त्याचा निर्णय त्यांनी घ्यावा, ही जबाबदारी कोर्टाने त्यांना दिलेली आहे. त्यानुसार ते पूर्ण प्रक्रिया करत असताना दिसत आहेत. मात्र असा कुठलाही दबाव, असा कुठलाही प्रभाव आपण कोर्टावर टाकू शकत नाही. विधिमंडळ हे न्याय मंडळ आहे आणि त्याचे प्रमुख म्हणून विधानसभा अध्यक्ष तिथे बसलेले आहेत. त्यामुळे काही लोक न्यायालयावर दबाव टाकतायत की, आमच्या बाजूने तुम्ही निर्णय द्या. न्यायालयाच्या प्रमुखांच्या चारित्र्यावर बोट उचलत आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टी विधानसभा नियम २७४ च्या अंतर्गत हक्क भंग प्रस्तावात बसत आहेत. त्यामुळे विधानसभेचे सचिव अशाच पद्धतीने विधानसभा हक्क भंग समितीकडे हा प्रस्ताव पाठवतील अशी अपेक्षा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली.
संजय राजाराम राऊत यांनी अगोदरही विधानसभेला चोरमंडळ म्हटलेलं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी या ठाकरे गटाच्या लोकांकडून उबाठाच्या नेत्यांकडून, विधानसभेच्या अध्यक्षांवर प्रभाव टाकण्याचा काम सुरू असल्याचे श्री. राणे म्हणाले.
सामना अग्रलेखात देशाचे सहकार मंत्री, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सहकार क्षेत्राच्या दृष्टिकोनातून टीका करणारा लेख लिहिलेला आहे. ज्याला सहकारातील स कळत नाही त्यांनी आयुष्यामध्ये एक साधा कारखाना सोडाच पण साधं एक साधं पानपट्टीच दुकान पण चालवलं नाही. ते देशाच्या सहकार मंत्र्यांवर आणि साखर कारखानदारीवर लिहिणं हे फार मोठ हास्यास्पद आहे. अमित शहा वर्षानुवर्षे सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत. गुजरात डिसीसी बँक असो किंवा अन्य सहकार क्षेत्रातील बाबीमध्ये त्यांचा दांडगा अनुभव आहे. जो देशाच्या इतिहासामध्ये या अगोदर कधीच झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने, केंद्र सरकारने पहिल्यांदा देशामध्ये सहकार मंत्रालय स्थापन केलं आणि त्यानंतर या सहकारी कारखान्यांना आणि सहकार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर क्रांतिकारी बदल होत असताना दिसताय. म्हणून ज्याला सहकारातील काहीच कळत नाही. संस्था डुबवणं हे त्यांच्या रक्तात आहे असा घणाघात आमदार नितेश राणे यांनी केलाय.
मुंबई महापालिका सारखी संस्था संजय राऊत च्या मालकाने डुबवली. त्याला खिचडी चोरीच्या शिवाय जमत नाही. बोडिबँक च्या चोरीशिवाय काय जमत नाही. प्रत्येक बाबतीमध्ये भ्रष्टाचार आणि चोरी आणि त्या पत्राचाळ च्या भ्रष्टाचारात त्या पत्राचाळ च्या मराठी लोकांना बेघर करणारा हा पत्राचाळच्या प्रकरणात भ्रष्टाचारी करणारा ४२० हा संजय राजाराम राऊत देशाच्या सहकार मंत्र्यांबद्दल आणि अमित शहांबद्दल बोलणार एवढी काय त्या संजय राजाराम राऊत ची कुवत नाही. देशाच्या पंतप्रधानांवर गृहमंत्र्यांवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्याएवढी कुवत नाहीय. अगोदर स्वतःच्या अंगावरची थुक बाजूला कर आणि मग बोल असा इशाराही श्री. राणे यांनी दिला.
दरम्यान पुढे ते म्हणाले, तुझ्या मालकावर तुझं एवढं प्रेम आहे तर तुझ्या मालकाच्या स्विस बँक अकाउंट बद्दल पण थोडी माहिती सामनाच्या माध्यमातून उघड करावी. तो काळा पैसा कुठला आहे. बाळासाहेब यांच्या मृत्यूच्या काही दिवसा अगोदर स्वीजरलँड मधून यायचे कोण थांबलेले ? जोपर्यंत पैसे ट्रान्सफर झाले नाही तोपर्यंत बाळासाहेबांची मृत्यूची तारीख का जाहीर केली गेली नाही हे पण जरा हिंमत असेल तर जगाला सांगा, असाही तोल श्री. राणे यांनी राउताना लगावला आहे. तसेच यांची जीभ जरा जास्त वळवळते आहे. यांना वाटतं की एवढा दबाव टाकल्यानंतर नार्वेकर यांच्या बाजूने निर्णय देतील. तर सत्य कोणच बदलू शकत नाही. जे कायद्याच्या चौकडीत असणार ते सांगण्याच काम विधानसभेचे अध्यक्षब्राहुल नार्वेकर करणार. मग आमच्या विरोधात कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच निर्णय घेणार म्हणून तुम्ही असा दबाव टाकू शकत नाही असा सल्ला देखील त्यांनी दिला.
दरम्यान सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, सत्ता असताना आघाडीच्या काळामध्ये थोडी वसुली कमी केली असती तर तुमचे गृहमंत्री जेलमध्ये गेले नसते. तुमच्यावर तुमच्या पक्षावर भ्रष्टाचारचे आरोप झाले नसते. तुमच्या
नवाब मलिक जेलमध्ये गेला नसता. दुसऱ्यांना सल्ला देण्यापेक्षा स्वतःच घर सांभाळा असा सला श्री राणे यांनी सुळे यांना दिला आहे.
आदित्य ठाकरेंवर अत्याचार सुरू आहे का ? मग त्यांनी आवाजाचा फायदा घ्यावा
यावेळी बोलताना आमदार नितेश राणे महिलांच्या ३३% आरक्षण बाबत आदित्य ठाकरेंनी काळजी करू नये. मात्र जर आदित्य ठाकरेंवर अत्याचार सुरू असतील तर त्यांनी आपल्या आवाजाचा फायदा घ्यावा











