‘हवामान खात्या’ने दिला इशारा
रत्नागिरी | प्रतिनिधी :मध्य-पूर्व अरबी समुद्रात अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) तयार झाले असून, आज (३० सप्टेंबर २३) संध्याकाळ ते रात्रीच्या दरम्यान हे डिप्रेशन पणजी ते रत्नागिरीच्या दरम्यान जमिनीवर प्रवेश करील. या क्षेत्राच्या प्रभावामुळे दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज उद्या (३० सप्टेंबर, १ ऑक्टोबर) काही ठिकाणी अतिवृष्टीची, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या इतर भागांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे – आयएमडी











