मुणगे गावासाठी बीएसएनएलचा मिनि मोबाईल टॉवर मंजूर करणार असल्याचा प्रस्ताव बीएसएनएलने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून दिला आहे या गावासाठी स्वतंत्र बीएसएनएलचा टॉवर देऊ असा शब्द आमदार नितेश राणे यांनी नुकताच दिला होता हा शब्द त्यांनी पूर्ण केला आहे
कोकणातल्या बहुतांशी ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची फार मोठी समस्या जाणवत आहे. मात्र आपल्या मतदारसंघात बीएसएनएलचे नेटवर्क सक्षम करण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत .ज्या ठिकाणी बीएसएनएल असेल त्या ठिकाणी बीएसएनएल, अथवा खाजगी कंपनीशी बोलून मोबाईल सेवा लोकांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
यापूर्वीच मुणगे येथे भेटीत या ठिकाणी बीएसएनएलची असलेली समस्या सोडवली जाईल असा शब्द त्यांनी दिला होता. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून मुणगे गावाला स्वतंत्र टॉवर देण्याबद्दल त्यांनी सूचना केल्या होत्या त्यानुसार नुकत्याच बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाडी वस्तीवर भेट देऊन पाहणी केली आणि मिनी टॉवर मंजुरीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून दिला आहे. आमदार नितेश राणे यांनी आपला शब्द पाळल्याबद्दल मुणगे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत










