
कणकवली : सध्या शहरात मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. यावेळी जयभवानी गोंधळी समाज संघ कणकवली पुरस्कृत आयोजित दुर्गामातेची प्रतिष्ठापना करम्यात आला आहे.यावेळी आ. नितेशराणे यांनी भेट देऊन श्री दुर्गा मातेचे दर्शन घेतले. यावेळी आमदार नितेश राणे यांचा जयभवानी गोंधळी समाज संघचे उपाध्यक्ष मल्लिकार्जुन मुकुंद वाघमारे यांच्या हस्ते शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यावेळी भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री, भाजपा युवा मोर्चा चिटणीस विजय इंगळे, जयभवानी गोंधळी समाजाचे अध्यक्ष मऱ्याप्पा इंगळे, उपाध्यक्ष शिवाजी भिसे, सचिव वैभव इंगळे, सहसचिव सुभाष इंगळे, खजिनदार शिवाजी वाघमारे, सहखजिनदार दिपक वाघमारे, कार्याध्यक्ष भिमराव इंगळे, माजी तालुकाध्यक्ष हनुमंत इंगळे, प्रभू कांबळे, माणिकराज वाघमारे, दत्तू इंगळे, सौरभ इंगळे, महेश कांबळे, नागेश सूर्यवंशी, पुंडलिक शिंदे, राजू भिसे, प्रथमेश इंगळे, महेश इंगळे, प्रकाश सूर्यवंशी, शंकर वाघमारे, राहुल नन्नवरे, व सर्व पदाधिकारी व सदस्य जयभवानी गोंधळी समाज संघ चे कार्यकर्ते उपस्थित होते












