चिपळुणात तुटलेल्या गटारात पडून बैल जखमी

चिपळूण : चिपळुणात आता निकृष्ट दर्जाच्या गटारांचाही विषय पुढे आला आहे. कोट्यवधी रूपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या गटारांचे स्लॅब ठिकठिकाणी तुटल्याने वारंवार अपघात घडत आहेत.

मंगळवारी पाग पॉवर हाऊस परिसरातील एका वर्तमानपत्राच्या कार्यालयाबाहेरील तुटलेल्या अशाच एका गटारात बैल पडल्याचा प्रकार घडला. या बैलाला स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रयत्नांची पराकाष्टा करीत बाहेर काढले असले तरी तो बैल जखमी झाला आहे. या घटनेला ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.