सत्यवान तळवडेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
राजापूर | वार्ताहर : राजापूर उपविभागाने पोलीस पाटील पदासाठी प्रथम अपात्र ठरविलेल्या उमेदवाराला पात्र ठरवित त्याच उमेदवाराला नियुक्त पत्र देऊन पात्र असलेल्या उमेदवारावर अन्याय झाला आहे. यामुळे नियुक्त झालेल्या उमेदवाराची नियुक्त रद्द करण्यात यावी अशी मागणी व तकार जिल्हाधिकारी यांच्याकडे कोंडये तर्फे सौंदळ येथील सत्यवान अनंत तळवेडकर यांनी केली आहे.
राजापूर तालुक्यातील कोंडये तर्फे सौंदळ येथील कोंडये तर्फे सौंदळ व मधलीवाडी (कोडये तर्फे सौंदळ) ही स्वतंत्र्य महसूल गावे आहेत. यामध्ये मधलीवाडी या महसूल गावाकरीता पोलीस पाटील पदाची भरती करण्यात आली. या पदाकरीता सत्यवान तळवडेकर, गणेश ठुकरूल व अनंत शिवगण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामध्ये गणेश ठुकरूल व अनंत शिवगण यांनी कोंडये तर्फे सौंदळचा रहिवासी दाखला जोडला असल्याने त्यांना तात्पुरते पात्र ठरविण्यात आले. मात्र कागद पडताळणी दिवशी दोन्ही उमेदवारांने ग्रामसेवकांचा मधलीवाडी येथील रहिवसी दाखला सादर केला. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी दिलेली माहीती ही खोटी असल्याचे सत्यवान तळवडे यांनी तकारीद नमूद केले आहे.
कागदपत्र तपासणीतून पोलीस पाटील मुलाखतीसाठी कागदपत्र पटताळणी अंती अनंत शिवगण या उमेदवाराला चारीत्र्य पमाणपत्र आधारकार्डवरील खालचीवाडी पत्ता नमूद असल्याची दखल घेत अपात्र ठरवित अपात्र यादीमध्ये सामाविष्ट केले. त्यानंतर पात्र उमेदवारांच्या 17 ऑक्टोंबर रोजी मुलाखत घेतली. मात्र उपविभागिय कार्यालयातून अनंत शिवगण यांची अपात्र यादीत नाव असतानाही पात्र ठरवित 18 ऑक्टोबर रोजी मुलाखत घेत मधलीवाडी (कोडये तर्फे सौंदळ) या महसुल गावाच्या पोलीस पाटील पदी नियुक्ती करण्यात आली. यामुळे पात्र असलेल्या उमेदवारावर अन्याय झाला असून या प्रकरणी चौकशी करण्यात यावी व अनंत शिवगण यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी सत्यवान तळवडेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.










