खेड रेल्वे स्थानकातुन दुचाकीची चोरी

खेड(प्रतिनिधी) खेड रेल्वे स्टेशनच्या प्रवेश द्वाराच्या डाव्या बाजुला लेडिज वेटींग रूमच्या बाहेरील बाजुस पार्किग करून ठेवलेली हिरो होन्डा कंपनीची अॅक्टिव्हा ३ – जी. पांढ-या रंगाची अँक्टिव्हा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना २८ रोजी सकाळी ०३.४५ वा. चे सुमारास उघडकीस आली

या प्रकरणी सौ. तरून्नम बिलाल सहिबोल, वय ३२ रा. अलसुरे ता. खेड जि. रत्नागिरी यांनी येथील पोलीस स्थानकात दिली यातील फिर्यादी यांचा मालकीची वरिल वर्णनाची व किंमतीची अॅक्टिव्हा गाडी ही खेड रेल्वे स्टेशनच्या प्रवेश द्वाराच्या डाव्या बाजुला लेडिज वेटींग रूमच्या बाहेरील बाजुस हँन्डल लॉक न करता पार्किंग करुन ठेवलेली गाडी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली