रत्नागिरी ः प्रतिनिधी :दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात चालक प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वा.रत्नागिरी ते हातखंबा जाणार्या रस्त्यावरील चाँदसुर्या येथे घडली.
रुपेश अरविंद साळवी (52,रा.संभाजीनगर नाचणे,रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.बुधवारी दुपारी ते आपल्या ताब्यातील अॅक्टिव्हा दुचाकी (एमएच-08-एडब्ल्यू-5469) वरुन हातखंबा ते रत्नागिरी असे येत होते.ते चाँदसुर्या येथे आले असता त्यांचा दुचाकीवरील ताबा सूटल्यामुळे दुचाकी घसरुन त्यांचा अपघात झाला.
या अपघातात त्यांना गंभिर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांंनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.












