पालीत किंगमेकर चॅम्पियन व पाली प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : पाली येथील किरणोदय युवा प्रतिष्ठानच्यावतीने भव्य ओव्हरआर्म ओपन डे-नाईट पाली प्रिमिअर लिग आणि किंगमेकर चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन 3 ते 7 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. गतवर्षी सुरु झालेल्या पाली प्रिमिअर लिगला खेळाडूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी किंगमेकर चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन प्रथमच करण्यात आले आहे.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि प्रसिध्द उद्योजक किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली किरणोदय युवा प्रतिष्ठान वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते. युवा क्रिकेटप्रेमींना मोठे व्यासपीठ मिळावे यासाठी गतवर्षी पाली प्रिमिअर लिगचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर यावर्षीही पाली प्रिमिअर लीग आयोजित करण्यात आली असून पाली-वळके रोडवर हेलिपॅड मैदानावर ही स्पर्धा डे-नाईट होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्याला 66,666 रुपये, उपविजेत्याला 44,444 रुपयांचे पारितोषिक दिले जाणार असून मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज, सामनावीरांचा गौरव केला जाणार आहे.

पाली प्रिमिअर लीगप्रमाणेच किंगमेकर चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन यावर्षी प्रथमच करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्याला 1,11,111 रुपयांचे पारितोषिक व भव्य चषक देण्यात येणार आहे. उपविजेत्याला 77,777 तर मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज, सामनावीर पुरस्कार देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छीणार्‍यांनी अधिक माहितीसाठी सौरभ खाके 7276181527, अतुल सावंत 9404160334, मनिष सावंत 8605356999 आणि नितीन गराटे 8999198428 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन किरणोदय प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.