“भूजल साक्षरता व पाण्याचा कार्यक्षम वापर” कार्यशाळेचे आयोजन

रत्नागिरी : राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पांतर्गत जनसामान्यांमध्ये 'भूजल साक्षरता व पाण्याचा कार्यक्षम वापर" याबाबत शालेय विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यशाळा फाटक हायस्कूल रत्नागिरी येथे 29 नोव्हेंबर रोजी उपसंचालक कार्यालय, कोकण विभाग नवी मुंबई यांच्यामार्फत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेमध्ये उपसंचालक कोकण विभाग डॉ. प्रमोद रेड्डी यांनी उपस्थीत विद्यार्थ्यांना भूजलाची उपलब्धता व त्याचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले लांजा प्रयोगशाळा येथील कनिष्ठ रसयनी तेजस भातडे यांनी पाण्याची गुणवत्ता व त्याचे महत्व यावर पि.पि.टी. द्वारे विद्यार्थ्यांना माहिती दिली.

शालेय विद्यार्थ्यांसाठी 'भूजलाचे महत्व, भूजलाचे पुनर्भरण, जलचक्र व भूजलाचे प्रदूषण इत्यादि विषयांवर निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धांचे कार्याशाळेत आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली तसेच उत्कृष्ठ निबंध व चित्रे काढणाऱ्या प्रथम 3 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
फाटक हायस्कूल शाळेचे मुखाध्यापक राजन कीर सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेत ही कार्यशाळा आयोजीत केल्याबाबत उपसंचालक व वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाचे आभार व्यक्त केले.