
देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था, देवगड आयोजित जल्लोष अर्थात स्वागत नववर्षाचे..
येणाऱ्या शनिवार दि.30 व रविवार दि.31 डिसेंबर रोजी देवगड बीच येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी अनुसूया कॉम्प्लेक्स येथे जल्लोष कार्यालयाचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले….
या कार्यक्रमासाठी सर्वच पत्रकार बंधू.. आमचे देणगीदार हितचिंतक, आजच्या कार्यालयाचे उदघाटक मा. शुभम घेवारी.. जल्लोष कार्यकारिणी अध्यक्ष मा. श्री. हनीफ मेमन, सचिव संजय धुरी,उपाध्यक्ष श्रीपाद पारकर, बंटी कदम, मिलींद मोर्ये, एकनाथ तेली,मिलींद मोहिते,दयानंद पाटील, दयाळ गावकर, दिनेश पटेल, मिलिंद खडपकर, जागेचे मालक चंद्रहास मर्गज आदी मान्यवर उपस्थित होते…
सर्वच मान्यवर पत्रकारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले..शुभम घेवारी यांनी उदघाटन पर भाषणात संबोधित करतांना जल्लोषला शुभेच्छा दिल्या..
पत्रकार संतोष कुलकर्णी, राजेंद्र मुंबरकर, हेमंत कुलकर्णी यांनी आपले विचार मांडले आणि काही पर्यटन योग्य सूचनाही केल्यात ज्याची पूर्तता करण्याची ग्वाही आयोजकांनी दिली…
श्री एकनाथ तेली यांनी सर्वांग सुदंर देवगड मध्ये असे कार्यक्रम वारंवार व्हावेत यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे असे सुचविले…कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैताली हडकर हिने केले
सचिव संजय धुरी उपस्थितांचे आभार मानले व थोडक्यात कार्यक्रमाची रूपरेषा समजावून दिली…
शनिवार दिनांक 30 डिसेंबर रोजी शालेय चित्रकला स्पर्धा होईल…खवय्यासाठी फूड्स्टॉल, लहान मुलासाठी अनेक खेळ असतील..सायंकाळी 7.00 वा.मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य स्टेजचे अनावरण होईल.. व गणेश वंदना होईल.. व 8.00 वाजता मा. आमदार नितेशजी राणे साहेब यांचे शुभ हस्ते जल्लोष कार्यक्रमाचे उदघाटन होईल… यानंतर उदघाटन पर स्थानिक कलाविष्कार सादर करण्यात येतील… व रात्रौ 9.00 वाजता ऑर्केस्ट्रा बेधुंद सादर करण्यात येईल..
यामध्ये गायिका कविता राम, नचिकेत देसाई आदी कलाकार असतील..
रविवार दि.31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.00 वाजता काही निवडक रेकॉर्ड डान्स सादर केले जातील..
रात्रौ 9.00 वाजता जल्लोष 2024 हा हास्य सम्राट फेम अमीर हडकर यांचाऑर्केस्ट्रा सादर केला जाईल. यामध्ये दगडी चाळ फेम पार्श्वगायिका
मुग्धा कराडे( पार्श्वगायिका झिम्मा,छबीदार छबी,राघू पिंजऱ्यात आला, अलाहीदा, पारवा, लग्नाळू) , स्वप्निल गोडबोले,सौरभ दप्तरदार अंशिका चोणकर (झी टीव्ही सारेगामापा 2021,रनर अप सुर नवा ध्यास नवा ), डांसर मेघा, निवेदक दुनियादारी फेम प्रणव रावराणे आदी कलाकार समाविष्ट असतील.
आणि रात्रौ बारा वाजता फटाक्यांची आतषबाजी होईल…
अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन यावर्षी करण्यात आलेल आहे.. आपण सर्वांनी बहुसंख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. परिवारातर्फे करण्यात येत आहे..











