स्वामींच्या नाम स्मरणाने जीवन सुखमय बनवा!

 

श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज 

श्री स्वामी समर्थ मठ मसदे-वडाचापाट वर्धापन दिन उत्साहात

मसुरे | झुंजार पेडणेकर :मसदे वडाचापाट येथे साकारलेल्या या स्वामी समर्थ मठासाठी सर्वांचे योगदान लाभले आहे. या सर्वांची मदत कधीही फुकट जाणार नाही. विविध उपक्रम संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहेत. लोकांचे प्रेम आपुलकी, सद्भावना यातून ही वास्तू उभी राहिली आहे. स्वामी समर्थ नावाने तुमचे जीवन प्रकाशमय होऊ शकते. आनंद, ऐश्वर्य, सुख प्राप्त होण्यासाठी श्री स्वामी समर्थ मंत्रातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यावा. या मंत्राची कृपादृष्टी निश्चितपणे प्राप्त होते. स्वामी समर्थ सेवेतून तुमच्या जीवनाचे कल्याण करा असे मौलिक उद्गार श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांनी मसदे वडाचापाट स्वामी समर्थ मठ येथे स्वामी भक्तांना मार्गदर्शन करताना काढले.

श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास (रजि.) संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे, वडाचापाट या मठाचा १२ वा वर्धापन दिन सोहळा नुकताच साजरा करण्यात आला. या निमित्त सकाळी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका अभिषेक,

श्री स्वामी समर्थांची षोडशोपचार पूजाअर्चा, पालखी पूजन,अक्कलकोट पादुका पालखी मिरवणुक सोहळा, महाआरती, दुपारी श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाका

महाराज यांचे आगमन आणि अध्यात्मिक मार्गदर्शन, दुपारी श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य अर्पण,

दुपारी महाप्रसाद (महाअन्नदान),सायं. सुस्वर भजने

दिपोत्सव,दिंडी पथक-

श्री गणेश वारकरी भजन मंडळ – त्रिंबक, ता. मालवण.आदी कार्यक्रम झाले. यावेळी यावेळी श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास सामाजिक अध्यक्ष श्री सिद्धेश किनळेकर,गोवा बेती उपासना केंद्राचे सचिव गिरी गावडे, भारतीय माथाडी कामगार सेना मुंबईचे अध्यक्ष श्री संतोष हळदणकर, श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट चे विश्वस्त श्री कृष्ण पाटकर, केंद्र प्रमुख साई पेडणेकर,सीता गावडे,राजेश प्रभुलकर, सुधीर पडेलकर,संदिप नामनाईक, तुकाराम माळकर, तानाजी पाटील, चंद्रसुहास घाडी, अमोल सुर्वे, उमेश मुणगेकर, आदी असंख्य भाविक भक्तगण उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी

श्री स्वामी समर्थ मठ मसदे, वडाचापाटचे सर्व भक्त गण, सेवेकरी उपस्थित होते.