खेड | प्रतिनिधी : कोकण रेल्वे मार्गावरील कारवार-भटकळ विभागादरम्यान ४ जानेवारी रोजी ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मालमत्ता देखभालीच्या कामासाठी सकाळी १२ वाजता सुरू होणारा मेगाब्लॉक दुपारी ३.०० वाजता संपेल.
या मेगाब्लॉकमुळे ४ रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. १६५८५ क्रमांकाची सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस बेंगळूर- मुर्डेश्वर एक्सप्रेस ३ जानेवारीला सुरू होणारा प्रवास भटकळ स्थानकादरम्यान संपेल. भटकळ- मुर्डेश्वर विभागादरम्यान अंशतः रद्द करण्यात येईल.











