खेड येथे स्त्रीमुक्तीदिन साजरा

खेड(प्रतिनिधी)

 खेड तालुका बौध्द समाज सेवा संघ (अंतर्गत)महिला समितीच्या वतीने  डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भवन खेड येथे स्त्रीमुक्तीदिन अर्थात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली
           प्रास्ताविक अपर्णा पवार यांनी करून कार्यक्रमाचा हेतू सांगितला,तर प्रमुख पाहुणे धम्मचारी अमोघसागर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर सखोल असे मार्गदर्शन करत पूर्वीची स्री व आत्ताची स्त्री यावर भाष्य केले.तसेच श्री.शैलेंद्र सकपाळ यांनी आरोग्याविषयी कोणती काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन केले.
        अध्यक्षा सौ.दिक्षिता तांबे यांनी सावित्रीबाई  फुलेंचा जीवन वृतांत सांगत ज्ञानसंपदा पतपेढीच्या सर्व योजनांची माहिती सांगून सद्यस्थितीत पायाभूत सुविधा,रोजगार,उत्तम शिक्षण, आरोग्य, पैसे देणारी शेती हाच महत्त्वाचा प्रश्न  असून तो एकट्यादुकट्याचा नाही तर सगळय़ांचाच आहे.याकडे तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता आहे.यासाठी तो प्रश्न लोकांनीच एकत्र येऊन  सोडवण्यासाठी प्रयत्न शील असायला हवे.असे मत सांगितले
        या कार्यक्रमासाठी सौ.मंगला तांबे,स्नेहा तांबे,रुपाली तांबे,स्वाती जाधव,दर्शना हळदे सुधीर जाधव, पांडूरंग शिर्के,अनंत पवार  ,सचिन शिर्के, श्री.हळदे व हुमणे तसेच महिला समितीच्या सर्व पदाधिकारी व खेड तालुक्यातील प्रत्येक शाखेच्या पदाधिकारी  महिला  व सदस्या उपस्थित होत्या.  सूत्रसंचालन सौ.रसिका जाधव मॅडम यांनी केले.