खेड लायन्स क्लब ऑफ सिटीच्यावतीने कार्याचा गौरव
खेड | प्रतिनिधी : वयाच्या ८०व्या वर्षीही शहरात असलेली शेतजमीन कसत शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या ग.रा. चिकणे (गुरुजी) यांना लायन्स क्लब ऑफ सिटीच्या वतीने सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्कार लायन्स क्लबचे प्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर व तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
महाडनाका येथील गोळीबार मैदानात आयोजित ‘लायन्स फेस्टिवल च्या शुभारंभप्रसंगी पोलीस निरीक्षक नितीन भोयर, लायन्सचे माजी गव्हर्नर जगदीश पुरोहित, उपप्रांतपाल एम. के. पाटील, उपप्रांतपाल डॉ वीरेंद्र चिखले, विभागीय चेअरमन डॉ. विजय रोळकर, मनोहर जैन, लायन्स क्लब ऑफ सिटीचे अध्यक्ष रोहन विचारे, सचिव सुरेश चिकणे, कार्यक्रमप्रमुख पंकज शहा, खजिनदार अनिल मोरे, उपकार्यक्रमप्रमुख राजेश जोयसर यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत जामगे येथील वृद्धाश्रमातील वृद्धांना सन्मानित करत त्यांना भेटवस्तू दिल्या. दापोली- असोंड आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनाही सन्मानित करत त्यांना धान्याचे वितरण करण्यात आले. तहसीलदार सोनावणे व पोलीस निरीक्षक भोयर यांनी लायन्स क्लबच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.








