राष्ट्रवादीच्या राजापूर तालुकाध्यक्ष पदी महेश मोरेश्वर करंगुटकर यांची निवड

राजापूर (प्रतिनिधी): राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजापूरच्या तालुकाध्यक्ष पदी दळे गावचे सरपंच महेश मोरेश्वर करंगुटकर यांची निवड करण्यात आली.

सदर निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या हस्ते देण्यात करंगुटकर यांना देण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा बँकचे संचालक राजेंद्र सुर्वे, संचालक रमेश दळवी उपस्थित होते.त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.