मालवण | प्रतिनिधी : मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी वर्ग अ पदावर नियुक्त झालेले आत्मज मोरे व मालवण महसूल नायब तहसीलदारपदी नियुक्त झालेल्या श्रद्धा चौगुले यांचा भाजपाच्या वतीने गुरुवारी स्वागत सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, नांदोस उपसरपंच विजय निकम, तिरवडे उपसरपंच सुशील गावडे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर, उपाध्यक्ष राकेश सावंत, शहर अध्यक्ष ललित चव्हण, कुबल, पाताडे आदी उपस्थित होते.












