सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या क्रीडा महोत्सवास प्रारंभ
सिंधुनगरी | बाळ खडपकर : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्य आणणाऱ्या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांचे हस्ते झाला. मुख्यालय पत्रकार व जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांच्यात प्रदर्शनीय क्रिकेट सामना उद्घाटन प्रसंगी रंगला! एक फेब्रुवारी रोजी बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमाने या महोत्सवाचा समारोप होत आहे. मार्च अखेर असणारा ताण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेचा हा महोत्सव कामी येतो.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवनिमित्ताने आयोजित जिप अधिकारी पदाधिकारी आणि जिल्हा मुख्यालय पत्रकार यांच्यात झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात जि प अधिकारी कर्मचारी संघ विजेता ठरला सिंधुदुर्ग जिल्हा परिषद च्या वतीनेजिल्हा परिषद पंचायत समिती अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे आज पोलीस परेड ग्राउंड वर या क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन जि प मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि मशाल ज्योत पेटवून करण्यात आले या निमित्ताने अधिकारी कर्मचारी आणि जिल्हा मुख्यालय पत्रकार यांच्या प्रदर्शनीय सामना झाला यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळे वित्त व लेखा अधिकारी बाळासाहेब पाटील ,शिक्षणाधिकारी कुडाळकर माझी गटविकास अधिकारी विजय चव्हाणसर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी आणि अन्य खाते प्रमुख कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल वालावलकर यांनी केले तर प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन श्री काळे यांनी केलेयावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी जिल्हा परिषद दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करते 28 जाने ते १ फेब्रुवारीयादरम्यान जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता दरम्यान शासनाने मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम माझ्या प्राथमिक शिक्षक ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांवर सोपवले आहे कालपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण होईल या दृष्टीने आमचे प्रयत्न होते याशिवाय मुदत वाढही जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती परंतु शासनाने शक्तीने मराठा कुणबी आरक्षणाची आकडेवारी सादर करणे आवश्यक असल्यामुळे 31 जानेवारीपर्यंत सर्व जिल्ह्यांचे मराठा आरक्षण सर्वेक्षण अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे या स्पर्धांमध्ये माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना सहभागी होता यावे या दृष्टीने या विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सव एक फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारी यादरम्यान घेण्याचे निश्चित केले असल्याचे जाहीर केले यादरम्यान उद्घाटन पर आयोजित करण्यात आलेला अधिकारी कर्मचारी आणि जिल्हा मुख्यालय पत्रकार यांच्यातील प्रदर्शनीय सामना झाला यात चांगलीच रंगत आली अधिकारी कर्मचारी संघाने नाणेफेक जिंकली यात झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये अधिकारी कर्मचारी संघासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर दोन चौकार मारले व आपल्या संघासाठी चांगलेच योगदान देऊन बक्षीसही मिळवले आणि विजयश्री खेचून आणलीजिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आणि अधिकारी कर्मचारी यांच्यातील या रंगतदार सामन्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी चांगली जात दिली होती दरम्यान उद्या एक फेब्रुवारीपासून जिल्हा परिषद कर्मचारी अधिकारीयांच्या विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सवहोणार आहे











