मंडणगड l प्रतिनिधी – रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मंडणगड तालुका शाखेच्या 59 व्या वर्धापन दिनाचे औचीत्यसाधून 30 जानेवारी 2023 रोजी बँकेत ग्राहक मेळाव्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्राहक मेळाव्यास बँकेचे संचालक रमेश दळवी, संचालक सुधीर कालेकर, प्राथमीक शिक्षक पतसंस्थेचे संचालक मनेष शिंदे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, माजी सभापती भाई पोस्टुरे, माजी पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर, डॉ. विकास शेट्ये, शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, सुधीर महाजन या प्रमुख अतिथींसह विकास संस्थांचे सचिव व बँकेचे ग्राहकांची मोठी उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना संचालक श्री. सुधीर कालेकर म्हणाले की, बँक व ग्राहक यांचे नाते अधिक दृढ करुन ग्राहकांच्या विविध अडचणी समजुन घेण्यासाठी ग्राहक मेळाव्यांचे आयोजन कऱण्यात आले आहे. सर्वांनी सहकार व सरकार यांच्यातील फरक समजुन घ्यावा सामान्यातील सामान्य माणसाची जन्मापासून मरेपर्यंतचे आर्थीक गरज भागावून त्याची विश्वसार्हता वाढविण्याचे बँकचे काम मर्यादीत अधिकारात सहकार चळवळ करते. तर पायाभुत सुविधांची निर्मीती सरकार करते मात्र शासनाचे अधिकार सहकाराच्या तुलनेत जास्त आहेत. याचबरोबर तालुक्यातील तरुणांनी शेती व शेती पुरक उद्योगांकडे वळण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली.
संचालक रमेश दळवी यावेळी बोलताना म्हणाले की, नियम व चौकटीचे पालन करुन बँकीग व्यवहार आर्थीक शिस्त आणण्याचा कसोसीने प्रयत्न केला आहे, यात कोण मदतीपासून वंचीत राहणार नाही याची काळजीही घेतली आहे. यावेळी सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले अनेक ग्राहकांनी आपल्या समस्यांही मांडल्या. शाखा व्यवस्थापक रत्नकुमार पाडलेकर यांनी ग्रहकांच्या विविध समस्या व शंकाचे निरसन यावेळी केले. याचबरोबर बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवांची विस्ताराने माहीती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एकनाथ दळवी यांनी केले. ग्राहक मेळावा यशस्वी कऱण्यासाठी सहाय्यक सरव्यवस्थापक उदय कदम, व्यवस्थापक रत्नकुमार पाडलेकर, उपव्यवस्थापक किशोर दळवी, मनोजयम बोरजी यांच्यासह बँक शाखा व क्षेत्रीय कार्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.











