खेड(प्रतिनिधी) खेड तालुका विधी सेवा समितीत्फे तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-१ डॉ सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शनानुसार पंचायत समिती खेड येथील सभागृहामध्ये ‘राष्ट्रीय मतदार दिवस व रस्ता सुरक्षा आणि वाहतुक चिन्हे’ या दोन विषयांवर मार्गदर्शन शिबीरे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी दिवाणी न्यायाधीश व स्तर खेड श्री.एन.एस.निसळ यांनी सन १९५০ पासून आपल्या देशात मतदान करणे चालू झाले असून जिल्हापरिषदेपासून लोकसभेपरयंत मतदान केले जाते. मतदान दिवस म्हणजे काय? कोणते
सरकार असावे याबाबत घटनेने आपल्याला अधिकार दिलेला आहे असे सांगून समाजामध्ये जागृती निर्मण करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो असेही त्यांनी यावेळी सांगितले,
तसेच २रे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती मनिषा पाटील यांनी रस्ता वाहतुक सुरक्षा नियमांचे सर्वानी पालन करायला हवे. जर प्रत्येक नागरीकाने स्वतः:पासून वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होईल. वाहतुकीच्या नियमांचे तथा वाहतुकीच्या चिन्हाचा अर्थबोध याविष्यी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे असे सांगितले.
सदर कार्यक्रमास दिवाणी न्यायाधीश व स्तर श्री.एन. एस.निसळ, २रे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती मनिषा पाटील तसेच पक्षकार व कर्मचारी वृंद मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खेड पंचायत समितीचे बिडी ओ श्री. वाय, एस. भांड,
श्री.एस. के.धनवटे, अधीक्षक श्री.एस.एल. लोंढे, तसेच तालुका विधी सेवा समिती खेडचे कर्मचारी श्रीमती के.एम.साळवी, श्री. एस. के. जोशी, श्री घरत व श्रीमती वाव्हळ यांनी परिश्रम घेतले.











