मंडणगड l प्रतिनिधी : मंडणगड तालुका विकास मंडळ F-1428 मुंबई संचलित पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूल चा सन 2023-24 चा इंटर मिजिएट परीक्षेचा निकाल 100% लागला आहे. या परीक्षेसाठी एकूण 13 विद्यार्थी बसले होते. यापैकी 1 विद्यार्थी ‘अ’श्रेणी मध्ये, एक विद्यार्थी ‘ब’श्रेणीत उत्तीर्ण झाला तर उर्वरित सर्व विद्यार्थी ‘क’ श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. इ.10 वी मधील कुमार सनी सुरेश चिंचघरकर याने ‘ अ’श्रेणी मिळवून बोर्डाकडून त्याने 7 अतिरिक्त गुणांची कमाई केली आहे.तसेच इ .10 वी मधील कुमारी साक्षी कोबनाक या विद्यार्थिनीने ‘ ब ‘श्रेणी मिळवून 5 अतिरिक्त गुणाची कमाई केली आहे. तसेच ‘ क ‘ श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यानी देखील 3 अतिरिक्त गुणांची कमाई करून शाळेचे नाव उज्वल केले आहे. परीक्षेत ‘अ’श्रेणी व ‘ ब ‘ श्रेणी मिळविणे अतिशय कठीण असताना व शाळेत कोणतेही कला शिक्षक नसताना या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश उल्लेखनीय आहे.या सर्व विद्यार्थ्यांना श्री. वाकचौरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व विद्यार्थांच्या या यशाबद्दल सर्व विद्यार्थांना प्रमाणपत्र व पुष्प गुच्छ देऊन सर्वांचे अभिनंदन प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री सूर्यवंशी सर यांनी केले.
सर्व विद्यार्थांच्या या यशाबद्दल मंडणगड तालुका विकास मंडळ F-1428 मुंबई चे अध्यक्ष , सरचिटणीस , चिटणीस व सर्व सभासद यांनी अभिनंदन केले.त्याचप्रमाणे शालेय समितीचे अध्यक्ष श्री.रामदासजी रेवाळे व सर्व सदस्य यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी शाळेचे शिक्षक श्री इंगळे सर, लिपिक पालकर भाऊ , व शिपाई हीलम आदी मान्यवर उपस्थित होते.प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण पंचक्रोशीतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.











