रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरी शहर महीला राष्ट्रवादी काग्रेस पार्टीच्या शहर अध्यक्षपदी सौ. पल्लवीताई सावंत यांची नियुक्ती महिला जिल्हाध्यक्षा सौ. दिपिकाताई कोतवडेकर यांच्या हस्ते करण्यात आली आणि त्यांनी पुढिल वाटचालीस शुभेच्छा देऊन लवकर शहर कमिटी स्थापन करण्याचे आदेश दीले त्यावेळी प्रदेश सचिव श्री. बशिरभाई मुर्तुझा, तालुकाध्यक्ष श्री. राजन सुर्वे, शहर अध्यक्ष श्री. निलेश भोसले, माजी नगरसेवक श्री. बबनराव आंबेकर, महिला शहर कार्याध्यक्ष सौ. मुनव्वरताई मुल्ला, युवक जिल्हाध्यक्ष श्री. नौसीन काझी, श्री. निहाल झापडेकर, सौ. कल्पनाताई भिसे, जिल्हा सरचिणिस सौ. नसीम सय्यद, दवरुख तालुकाध्यक्ष सौ. दिपिका किर्वे, सौ. दुरदाना प्रभुलकर, सौ. नसिमाभाभी डोंगरकर, सौ. रजिया झापडेकर आदि. महीला कार्यकर्त्या उपस्थीत होत्या.
सौ. पल्लवीताई सावंत यांनी याआधी समाजसेवा करत असताना राष्ट्रवादि कांग्रेस पार्टी या पक्षामध्ये प्रवेश करून पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली. सौ. पल्लवीताई सावंत याचे कार्य पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महीला शहर अध्यक्षपदि त्यांची नियुक्ती झाली असुन त्यांनी रत्नागिरी शहरामध्ये महीला संघटन वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी शहरामध्ये सर्व वार्डमध्ये फीरून महीलांशी संपर्क करुन राष्ट्रवादि काग्रेस पार्टीची ध्येय धोरणे पटवून देण्याचे काम करणार असुन लवकरच रत्नागिरी शहरातिल सर्व वार्ड अध्यक्ष नेमण्यात येणार असल्याचे सौ. पल्लवी सावंत यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव श्री. बशिरभाई मुर्तुझा आणि तालुका अध्यक्ष श्री राजन सुर्वे यांनी शहरातील सर्व वार्डमध्ये महीला राष्ट्रवादी काँग्रेस मजबुत होण्यासाठी सर्वतोपरी मदत शहर अध्यक्षा सौ. पल्लवीताई सावंत यांना करणार असल्याचे सांगितले. रत्नागिरी शहर आणि महीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा लवकरच भव्य मेळावा घेण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष श्री. राजन सुर्वे यांनी सांगितले.












