भारतीय जनता पार्टीच्या गाव चलो अभियानाची भिंगळोली येथे सुरुवात.

 

मंडणगड l प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचेवतीने 6 व 7 फेब्रुवारी 2024 या दोन दिवसांचे कालावधीत देशस्तरावर हाती घेण्यात आलेल्या गाव चलो संपर्क अभियान मंडणगड तालुक्यात राबवण्यात आले आहे. तालुक्यातील अभियानाचा शुभांरभ (6) रोजी भिंगळोली येथून करण्यात आला. अभियानाची सुरुवात पार्टीत नव्याने प्रवेश केलेले प्रकाश शिगवण, तालुका अध्यक्ष अप्पा मोरे, सरचिटणीस गिरीष जोशी, सचिन थोरे, भावेश लाखण, पुंडलीक सावंत, आकाश नाविलकर, दादा कोकाटे, रविकुमार मिश्रा, प्रविण कदम, यश मेहता, वैभव नारकर, दशरथ तांबीटकर, मेहश महाजन यांच्यासह पार्टीच्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. पुर्ण देशात दोन दिवस चालणाऱ्या या अभियानात पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आमदार खासदार मंत्री हे पुढील दोन दिवस आपले कार्यक्षेत्र सोडून अन्य कार्यक्षेत्रातील ग्रामिण भागात जावून पार्टीची उपलब्धी जनतेस समजावून सांगणार आहेत.

गेल्या नवू वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शासनाने विविध समाज घटकाचे कल्याणाकरिता केलेले काम व शासनाच्या जन कल्याणाच्या विविध योजना सर्वसामान्यांना समजावून सांगणार आहेत. पहील्या दिवशी लाटवण कुंबळे तिडे या पंचक्रोशीतील सर्व गावामध्ये इंझावती संपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. याचबरोबर दुसऱ्या दिवशी तालुक्यातील अन्य गावांत प्रत्येक जिल्हा परिषद प्रभाग व पंचायत गणात अभियान राबवीले जाणार असल्याची माहीती पार्टीचेवतीने देण्यात आली आहे.