सुमारे 37 हजार किंमतीच्या मुद्देमालाची चोरी
आचरा पोलीस ठाण्यात आज्ञाता विरोधात गुन्हा दाखल
आचरा | प्रतिनिधी
चिंदर भगवतगड येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची ईलेक्ट्रीक लाईन सुमारे 5 वर्षापासून बंद असलेल्या लाईनचे चिंदर भगवंतगड येथील कालावल खाडीचे रोडच्या उजव्या बाजुस बंद असले जिर्ण झालेले लोखंडी पोल व त्यावरील अॅल्युमिनियमची ईलेक्ट्रीक तार अज्ञात चोरट्यांनी कापुन चोरुन नेली असल्याचीं घटना घडली असून याबाबतची तक्रार आचरा वीज वितरणचे सहाय्यक अभियंता अनिल धोंडीबा मटकर यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रारी नंतर आचरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर चोरीत लोखंडी पोल व इतर साहित्य सुमारे हे 16 हजार किंमतीचे तर ईलेक्ट्रीक तार सुमारे 21 हजार किंमतीची असून एकूण सुमारे 37 हजार किंमतीचे साहित्य चोरीस गेले आहे.
आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मठकर यांनी दिलेल्या तक्रारीत गाव मौजे चिंदर भगवतगड येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची ईलेक्ट्रीक लाईन सुमारे 5 वर्षापासुन बंद आहे. सदर लाईनला पर्यायी व्यवस्था म्हणून नविन ईलेक्ट्रीक लाईन सुमारे 5 वर्षापासुन कार्यरत आहे. मी स्वता व नाझे अधिपत्याखालील लाईनमन श्री संजय परब, व श्री पांढरपिसे यांनी सदरची लाईन ही माहे 25 डिंसेबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाचे दरम्याने प्रत्यक्ष पाहीलेली होती. तदनंतर दि. 24/01/2024 रोजी चिंदर भंगवलगड येथे राहणारे ग्रामस्थ श्री समिर लब्दे यांचा माझे मोबाईलवर कॉल आला व त्यांनी चिंदर भगवंतगड येथील कालावल खाडीचे रोडच्या उजव्या बाजुस असले वर नमुद जुने व बंद असलेल्या ईलेक्ट्रीक लाईनचे जिर्ण झालेले लॉखड़ी पोल व त्यावरील अल्युमिनियमची ईलेक्ट्रीक तार कोणीतरी कापुन चोरुन नेली असल्याचे सांगीतले वरुन मी दि. 25/01/2024 रोजी चिंदर भगवंतगड येथे लाईनमन श्री संजय परब, व श्री पांढरपिसे याचे सोबत जावुन सकाळी 11.00 वा चे सुमारास खात्री करता चिंदर भगवंतगड येथील बंद असलेल्या ईलेक्ट्रीक लाईनचे जिर्ण झालेले एकुण 8 लॉखड़ी पोल व इतर साहित्य असे मिळून सुमारे व त्यावरील थ्रिफेज अॅल्यमिनियमची सुमारे 1400 मीटर ईलेक्ट्रीक तार कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी हत्याराने कापुन चोरून नेल्याचे दिसुन आले. चोरीस गेले ईलेक्ट्रीक लॉखडी पोल व इतर साहित्य सुमारे हे 16 हजार किंमतीचे तर ईलेक्ट्रीक तार सुमारे 21 हजार किंमतीची असून एकूण सुमारे 37 हजार किंमतीचे साहित्य चोरीस गेले असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.










