हातखंबा : सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्रीडा आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रात गेली ३५ वर्ष कार्यरत असणाऱ्या योगायोग मित्र मंडळ हातखंबा तर्फे सार्वजनिक माघी गणेशोत्सवाचे १३ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले असून हे उत्सवाचे ३२ वे वर्ष आहे.
गेली 31 वर्ष या उत्सवामध्ये समाज उपयोगी उपक्रम राबवले जात असतात यावर्षीही ३२ व्या वर्षी उत्सवानिमित्त क्रीडा विभागात दशक्रोषी मर्यादित भव्य कब्बडी स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व चित्रकला स्पर्धा, शालेय तालुकास्तरावर गणेशमूर्ती बनवणे स्पर्धा, महिलांसाठी होम मिनिस्टर – खेळ सोन्याचा नथीचा स्पर्धा, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्थानिक कलाकारांचा “आर्केस्ट्रा हौशी कलाकार” अश्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सत्याविनायक महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर उत्सवानिमित्त सर्वांनी श्री गणेशाचे दर्शन व तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री. योगेश मेस्त्री यांनी केले आहे.









