आरगाव कामादेवी ते फौजदार वाडी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न
लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील आरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आरगाव कामादेवी ते फौजदारवाडी शाळा क्रमांक एक पर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच पार पडले.
जन सुविधा या फंडातून पाच लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर झाला आहे .या रस्ता भूमिपूजन कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक महेश खामकर, ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ शमिका खामकर ,उपसरपंच स्वानंद कदम, ग्रामपंचायत सदस्य शैलेश खामकर, प्रियांका खामकर, कविता पांचाळ, केदारलिंग न्यासाचे अध्यक्ष उत्तम खामकर, सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष श्याम खामकर, आरगाव सामाजिक कार्यकर्ते ,विविध कार्यकारी संस्था संचालक चंद्रकांत खामकर तसेच भाई खामकर ,प्रमोद खामकर, संदेश खामकर, पद्माकर खामकर, महादेव खामकर, प्रशांत खामकर, अशोक खामकर, प्रभाकर सरफरे, राजू सरफरे, वसंत माने, विश्वास माने, सदानंद खामकर, चंद्रकांत खामकर, सुरेश सरफरे ,प्रथमेश खामकर, अभिषेक खामकर, रामदास खामकर, अदु खामकर, यांच्यासह अन्य ग्रामस्थ महिलावर्ग उपस्थित होते.












