गुहागरातील निलेश राणेंच्या सभेत डॉ विनय नातू झाले आक्रमक
गुहागर l प्रतिनिधी :आजपर्यंत यांनी खूप सोंगे केली अनेकवेळा दुसऱ्यांची टिंगल टवाळी केली मात्र आता गुहागरमधील जनता हे खपवून घेणार नाही आता यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल असा आक्रमक इशारा गुहागरचे माजी आम.डॉ विनय नातू यांनी दिला.शृंगारतळी येथे भाजप नेते निलेश राणे यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,राणे साहेब कार्यकर्त्यांवर इतकं प्रेम करतात की त्याच्या पूर्ण पाठीशी ठाम उभे राहतात.निलेश राणेंच्या आजच्या या सभेमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. गाव चलो अभियानातून आपण गावागावात पोहचलो आहोत. 2014 ला युतीतील वादाचा फायदा भास्कर जाधवांना झाला. 2019 ला आपण पडणार म्हणून आधीच ते युतीत आले.राष्ट्रवादीत गेले तेंव्हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची यांनी टिंगल टवाळी केली आहे.
कुठलीही योजना आली तरी ती माझ्याच घरात आली पाहिजे.खिचडी घोटाळा जो गाजतोय त्याची पाळेमुळे गुहागर मतदार संघातील पदाधिकारी यांच्या घरापर्यंत आली आहेत.समुद्रकिनारी यांच्या जमिनी एवढ्या प्रमाणात कशा आल्या.या सर्वांची चौकशी झाली पाहिजे त्यामुळे आता ही गुहागरची जनता गप्प बसणार नाही यापुढे जशाच तसे उत्तर दिले जाईल असे त्यांनी ठणकावून सांगितले.











