वेंगुर्ला लिनेस क्लब च्या अध्यक्षपदी ॲड. सुषमा प्रभूखानोलकर यांची फेरनिवड..

वेंगुर्ले | दाजी नाईक : वेंगुर्ला लिनेस क्लब चा पदग्रहण सोहळा दाभोली येथे “माई” निवासस्थानी पार पडला. यावेळी वेंगुर्ला लिनेस क्लब च्या अध्यक्षपदी ॲड. सुषमा प्रभूखानोलकर यांची फेरनिवड करण्यात आली. दाभोली येथे खेळीमेळीच्या वातावरणात हा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. यावेळी सौ. पल्लवी कामत यांना सेक्रेटरी पदाची व सौ. कविता भाटिया यांना खजिनदार पदाची. तसेच सौ. मंदाकिनी सामंत यांना टेमर व सौ.बिना भाटिया यांना टेल ट्विस्टर पदाची व इतर सदस्यांना सभासदत्वाची शपथ सौ. प्राची मणचेकर यांनी दिली.

यावेळी लिनेस क्लबच्या सौ. हेमा गावस्कर, श्रीमती निला यरनाळकर, दिशा कर्पे, डॉ. वसुधा मोरे व दाभोली गावातील निमंत्रित महिला उपस्थित होत्या. यावेळी सर्व महिलांसाठी हळदीकुंकूचा कार्यक्रम पार पाडला. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन सौ.सुषमा खानोलकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. हेमा गावस्कर यांनी केले. तसेच सर्व कार्यक्रमाचे नियोजन व अल्पोपहाराची सोय सौ. हेमा गावस्कर यांनी केली होती.