खेड (प्रतिनिधी) तालुका रोहिदास समाज सेवा संघाच्यावतीने तालुकाध्यक्ष दिनेश शिरीषकर यांच्या अध्यक्षतेखाली २४ फेब्रुवारी रोजी भरणे – बाईतवाडी येथील संघ कार्यालयात संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे.
यानिमित्त सकाळी ९.३० वाजता संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, ११ वाजता हळदीकुंकू समारंभ, दुपारी १२ वाजता सत्कार, विद्यार्थी गुणगौरव व रोहिदास महाराजांच्या जीवनावर आधारित मनोगते होणार आहेत. दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ ते रात्री ८ यावेळेत मंडपात महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन होईल. तालुक्यातील विभागप्रमुखांसह समाजबांधवांनी व महिलांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष दिनेश शिरीषकर यांनी केले आहे.












