.माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पार्थिवाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतले अंत्यदर्शन

 

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचे आज निधन झालं. यानिमित्ताने त्यांच्या दादर येथील निवासस्थानी जाऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तसेच त्यांच्या कुटूंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.

शिवसेनेच्या स्‍थापने पासून आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे सहकारी, शिवसेनेच्‍या पहिल्‍या फळीतील नेते अशी त्‍यांची ओळख होती. मुंबई महापालिकेमध्‍ये नगरसेवक पदापासून देशाच्‍या सर्वोच्‍च संसदेच्‍या अध्‍यक्ष पदापर्यंत त्‍यांच्‍या राजकीय कारकिर्दीचा आलेख चढता राहिला. प्रिंसिपल मनोहर जोशी यांचे निधन दु:खदायक आहे अशा शब्दांत नारायण राणे यांनी आपली श्रद्धांजली वाहिली.