खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील घोगरे जाखनवाडी येथील युवा प्रतिष्ठान जाखनवाडीच्या वतीने २५ ते २६ मार्च रोजी जाखनवाडी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विजेत्यास २५ हजार रूपये, उपविजेत्यास १५ हजार रूपये व चषक देवून गौरवण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलदांज, उत्कृष्ट गोलंदाज यांनाही रोख रक्कम व चषक देवून गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सुधीर शिंदे, आशिष जाधव, करण शिंदे, राज जाधव, दिलीप उपाले व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.











