कणकवली करांचे विकासाचे स्वप्न महायुती व मोदी सरकारच्या माध्यमातून पूर्ण करू; आ.नितेश राणे

*पालकमंत्री रवींद्र चव्हाण,आमदार नितेश राणे यांच्या हस्ते जाणवली ,कणकवली ला जोडणाऱ्या पुलाचे झाले भूमिपूजन
* दिलेला शब्द आज पूर्ण केला,राज्यात कणकवली शहराची विकसित शहर अशी ओळख
* माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या कारकिर्दीत झालेल्या कामाचे झाले कौतुक

कणकवली : प्रशासकीय राजवट असेल पण कोणत्याही कामात विकासाची मानसिकता महत्त्वाची आहे. कोण सत्तेमध्ये आहे हे फार महत्त्वाचे आहे. सत्तेचा वापर जनतेसाठी कसा करता, सत्ता असो लोकप्रतिनिधी असो किंवा नसो कणकवलीकर जनतेसाठी आम्ही ३६५ दिवस आणि २४ तास काम करणारे कार्यकर्ते आहोत. निधी मोठ्या प्रमाणात महायुतीचेच सरकार आणत आहे. अशाच पद्धतीने भविष्यामध्ये कणकवलीकरांनी जी – जी स्वप्न पाहिली असतील ती स्वप्न महायुतीच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण होतील, असा विश्वास आ. नितेश राणे यांनी दिला.

कणकवली शहरासाठी विकासात्मक पाऊल ठरणाऱ्या जानवली – सापळेबाग ते गणपती साना जोडणारा जानवली नदीवरील पुलाचे भूमिपूजन पालकमंत्री रविंद्र चव्हाण व आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाले. या यावेळी आयोजित भूमिपूजन सोहळ्यात आ. नितेश राणे बोलत होते.
यावेळी माजी आ. प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, महेश सावंत, माजी नगरसेविका मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, मेघा सावंत, कविता राणे, संजय कामतेकर, अभिजित मुसळे, किशोर राणे, अभय राणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता छाया नाईक, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, विलास गावकर, कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, सावंतवाडी कार्यकारी अभियंता महेंद्र केणी, उपविभागीय अभियंता कमलिनी प्रभू, उपअभियंता विनायक जोशी, श्री. बासुतकर, व्यंकटेश सावंत, संदीप सावंत, रंजन राणे , जानवली सरपंच अजित पवार, बबलू सावंत, भाई आंबेरकर, परशुराम झगडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, कणकवलीकरांनी आम्हाला नगराध्यक्ष म्हणून समीर नलावडे व त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांना निवडून दिले. त्या प्रचाराच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शब्द दिलेला की, कणकवलीचा चेहरा – मोहरा आम्ही बदलून दाखवू. त्या पद्धतीने गेली पाच वर्ष आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी आणि सर्व सहकाऱ्यांनी एकत्र मिळून विविध विकास काम या कणकवलीमध्ये केलेली आहेत. ज्या पूलाचे भूमिपूजन केले तो आमचा एक महत्त्वकांशी प्रकल्प होता. त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो. जेणेकरून कणकवली मध्ये होणारे ट्राफिक आणि जानवलीसह आजूबाजूच्या गावांची कनेक्टिव्हिटी वाढेल, या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न होता. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सहकार्य केल्यामुळे पुलाला मंजुरी मिळाली. त्यामुळे नियोजित केलेली कामे सत्यात उतरवण्यासाठी फार मोठी मदत केली. हा पूल १५ जून पर्यंत लोकांच्या सेवेत सुरू करायचा आहे. देशाचे पंतप्रधान नेहमी सांगतात की, भूमिपूजन ही आम्हीच करतो आणि उद्घाटन देखील आम्हीच करतो. तोच धागा धरून या प्रकल्पाचे भूमिपूजन आम्ही केलेल आहे. येणाऱ्या जून महिन्यात या पुलाचे उद्घाटन देखील आम्हीच करणार आणि पुन्हा कणकवलीची विकसित कणकवली म्हणून ओळख महाराष्ट्र समोर आणि देशासमोर आणणार असल्याचे आ. नितेश राणे यांनी सांगितले.