रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार, तथा भाजपाचे युवा नेते, आम्हा युवा वर्गाचे आशास्थान डॉ. नीलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…

कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री, खा. नारायणराव जी राणे साहेब यांनी विकास कामांचा धडाका लावून आपल्या कोकणचे नाव देशपातळीवर नेले. मुम्बईतील शासकीय कार्यालयात, कोकणातील माणूस म्हणून जी सामान्य कोकणी माणसाला शून्य वागणूक भेटत होती, राणे साहेबांमुळे तिथेही प्रतिष्ठा प्राप्त झाली, आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून नीलेशजी राणे साहेब यांनीही कोकणी माणसाचा गौरव आपल्या कार्य कर्तृत्वाने वाढवला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले सर्वात तरुण नेतृत्व म्हणून त्यांचा गौरव करावा, की विरोधी पक्षात असताना देखील सामान्य कार्यकर्त्यांसाठी प्रस्थापित सरकारी दादागिरीला टक्कर देणारा आपला जिवाभावाचा माणूस म्हणून त्याचा आदर करावा, सर्व काही त्याला साजेसे.

सर्वात तरुण खासदार म्हणून निवडून आल्यावर देखील केवळ आपल्या मतदार संघापुरता विचार न करता पूर्ण महाराष्ट्रातील तरुणांचे आशास्थान म्हणून अतिशय प्रेरणादायी काम केले. आपल्या कामाची घोडदौड चालू असताना संपूर्ण कोकणात युवा नेतृत्व म्हणून आपला ठसा उमटवला.

आपल्या कुटुंबाकडून सामाजिक बांधिलकीचे मिळालेले धडे डॉ. नीलेशजी राणे साहेब कायम पळताना दिसतात. म्हणूनच तरुण कार्यकर्त्यांची फौज कायम त्यांच्या मागे उभी असते, कोणाला कसलीही मदत लागली तर आपल्या माणसाला म्हणजेच राणे साहेबाना हक्काने कॉल करतात.

मुम्बई गोवा महामार्गाचे काम रत्नागिरी जिल्ह्यात संथ गतीने सुरू असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे, आणि त्याचे पूर्ण श्रेय राणे कुटुंबाला द्यावे लागेल. हा महामार्ग बऱ्यापैकी पूर्ण करण्यासाठी वेळ प्रसंगी सरकारच्या विरोधात उभे राहायला त्यांनी कमी केले नाही. कारण सर्वसामान्यांची अडचण पहिली दूर झाली पाहिजे हा दृष्टिकोन…
म्हणूनच कोकण म्हटले की राणे… बाकी कोणी दिसत नाही.

अमोल सावंत, रत्नागिरी