राजापूर शहराचा दिवसाआड पाणी पुरवठा होळी उत्सवामुळे आता २० ऐवजी २६ मार्चपासून

राजापूर / प्रतिनिधी –

हिंदू बांधवांच्या होळी सणाच्या औचित्याने २० मार्चपासून केला जाणारा शहराताल दिवसाआड पाणी पुरवठा एक आठवडा पुढे ढकलण्याबाबत ओबीसी संघर्ष सामितीचे तालुकाध्यक्ष महेश शिवलकर यांनी मंगळवारी दिलेल्या निवदनाला राजापूर नगर परिषद प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असुन आता शहरातील दिवसाआड पाणीपुरवठा २० मार्च ऐवजी २६ माचपासून केला जाणार आहे .

दि. २३ मार्चपासून कोकणातील हिंदू बांधवांच्या प्रत्येक घरोघरी होलिकोत्सव साजरा होणार आहे. येत्या होळीच्या सणासाठी राजापूर शहरात ही घरोघरी चाकरमानी दाखल होणार असतानाच राजापूर नगर पारिषदने बुधवारी २० मार्चपासूनच शहरात दिवसाआड पाणापुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे न.प. प्रशासनाविरोधात यंदा होळीच्या फाका घुमणार असल्याचे दिसू लागले हाते . बहुसंख्य बांधवांकडून घरोघरी चाकरमानी दाखल हाणार असल्याने दिवसाआड पाणीपुरवठा होळीचे प्रमुख दिवस वगळून केला जावा अशी मागणी होत होती. यामध्ये मुंबई, पूणे आदि भागाताल चाकरमान्यांचा व शहरवासीयांचा समावेश होता .

होळी आणि गणशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी अखंड कोकणात दाखल होत असतात. या सणांसाठी बंद घरांची दारे उघडली जातात. राजापूर शहरही याला अपवाद नाही. मात्र नेमक्या याच कालावधीत होलिकोत्सवाच्या चार दिवस आधीपासूनच नगर परिषदने दिवसाआड पाणी वितरण करण्याचा निर्णय घतल्याने नागरिकांसह चाकरमान्यांची आबाळ होणार होती. याबाबीकडे लक्ष वेधत ओबीसी संघर्ष सामितीचे तालुकाध्यक्ष महेश शिवलकर यांनी निवेदनाद्वारे मंगळवारी न.प. प्रशासनाचे लक्ष वेधले .

गतवर्षी शहरातून वाहणा-या अर्जुना व किदवली नदीपात्रासह राजापूर शहराला पाणीरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाच्या धरणातील गाळ उपसा करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी पाण्याची पातळी चांगली राहून पाणीटंचाई जाणवणार नाही असा अंदाज बांधला जात असतानाच बाष्पीभवनाने पाणीपुरवठा करणा-या सायबाच्या धरणातील पाणीपातळी खालावली गेली आहे. मात्र होलिजोत्सव सुरू होणारा कालावधी वगळून २६ मार्च पासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी नागारीक व स्थानिक पूणे – मुबइकरांनी केली होती राजापूर नगर पारिषदने या मागणीचा विचार करून दिवसाआड पाणापुरवठा २० मार्च ऐवजी २६ मार्चपासून करण्याचा फेरनिर्णय घतल्याने श्री. शिवलकर यांनी न. प. प्रशासनाचे आभार व्यक्त कले आहेत.