बांदा (प्रतिनिधी) : शेर्ले – कापईवाडी येथील मोहन पांडुरंग धुरी (८१) यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. गुरुवारी सकाळी शेर्ले स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे बांदा मंडळ तालुकाध्यक्ष महेश धुरी यांचे ते वडील होत.
———











