आवाशी नजीक कार दुचाकी अपघातात एकजण ठार

 

खेड(प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्ग वरील आवाशी मसालेबाबा पॉईट
नजीक मुंबई गोवा हायवे लेन वरुन खेड |दिशेकडुन चिपळुण दिशेकडे जात असताना हुंडाई कारवर पाठीमागून दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकी स्वार ठार झाल्याची घटना २९ मार्च रोजी सांयकाळी ५.३५ वाजण्याच्या सुमारास घडली

रमेश दत्ताराम रेमजे, वय – ५१ वर्षे असे त्या ठार झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे तर या प्रकरणी
समुख शशिकांत पालकर, वय – ४४ वर्षे यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

यातील दुचाकी स्वार रेमजे हा स्वताच्या ताब्यातील वाहन हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स मोटार सायकल क्रमांक एम.एच.०८/ए.जे./७३३५ ही मुंबई गोवा हायवे लेनवरुन खेड दिशेकडुन चिपळुण दिशेकडे जात असताना आवाशी मसालेबाबा याठिकाणी आलेवेळी कार चालक पालकर यांचे ताब्यातील हुंडाई कंपनीची क्रेटा गाडी क्रमांक-एम.एच.०८/ए.एक्स. / ९५५९ या वाहनास पाठीमागुन ठोकर दिली देवुन अपघात केला अपघातात स्वताचे चेह-यास गंभीर दुखापती होवुन स्वताचे मृत्युस कारणीभुत झालेला म्हणून मयत दुचाकी स्वार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.