अंध विद्यालयात व्यवसाय प्रशिक्षण, कौशल्य विकास विभाग

घराडी येथे उपक्रम; यश स्नेहा ट्रस्टने घेतला पुढाकार
खेड (प्रतिनिधी) मंडणगड तालुक्यातील घराडी येथे यश स्नेहा ट्रस्ट संचालित स्नेह ज्योती अंध विद्यालय येथे व्यवसाय प्रशिक्षण तसेच कौशल्य विकास विभाग सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये १७ पासून पत्रावळी द्रोण उत्पादन प्रशिक्षण सुरू झाले आहे.
या विभागाचे अध्यक्ष उत्तमकुमार जैन यांनी आगामी काही महिन्यात अजुन काही कोर्स सुरू करणार असून यंत्र सामग्रीसह सुसज्ज केंद्र स्थापित करणार असल्याचे यावेळी सांगितले.
 मंडणगड तालुक्यातील घराडी येथे १७ रोजी स्नेह ज्योती अंध विद्यालय येथे व्यवसाय प्रशिक्षण तसेच
कौशल्य विकास विभाग सुरू झाला,त्यामध्ये कागदी पत्रावळी द्रोण बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा आरंभ शालेय समिती सचिव संदीप सुखदरे यांनी कार्यशाळा खोलीची फित कापली. शालेय समिती अध्यक्ष उत्तमकमार जैन
यांनी श्रीफळ वाढवले. मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता, विद्यार्थी वेदांत, नैतिक, पूजा, चैताली व नंदिनी यांच्या हस्ते पत्रावळी द्रोण बनवण्याच्या यंत्राचे हॅण्डल फिरवून उद्घाटन करण्यात आले.