विभागीय शालेय तायक्वाँडो स्पर्धेत रोटरी स्कूलचे दैदीप्यमान यश.

खेड – ( प्रतिनिधी )

दिनांक 12 ते 14 सप्टेंबर 2025 दरम्यान विभागीय शालेय तायक्वाॅंडो स्पर्धा कोल्हापूर येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 3 सुवर्ण, 2 कांस्य पदकांची कमाई करून यश संपादन केले.

सदरच्या स्पर्धेत कोल्हापूर विभागातील 5 जिल्हे व महानगरपालिकेतील 2 संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये *रोटरी स्कूलचे खेळाडू कु. ईश्वरी गोरे, विधी गोरे, कु. रुद्र शिगवण यांनी सुवर्ण पदक तर कु. सई चाळके, कु. जेनिसन नाडर या विद्यार्थ्यांनी कांस्य पदक पटकावून आपले व रोटरी स्कूलचे नाव रोशन केले आहे.* सर्व सुवर्ण पदक विजेत्यांची दि. 13 ते 15 ऑक्टोबर 2025 रोजी संभाजी नगर येथे होणार्‍या राज्यस्तरीय शालेय तायक्वाँडो स्पर्धेकरिता निवड झाली आहे.

खेळाडूंनी मिळविलेल्या या यशामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तायक्वाँडो संघामधील सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडाशिक्षक व तायक्वाँडो प्रशिक्षक श्री. कृणाल चव्हाण सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.