प्रज्ञाशोध परीक्षेत एडगांव नं. 1 प्रशालेची कु. ज्ञानदा खुळपे तालुक्यात प्रथम

वैभववाडी | प्रतिनिधी
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत श्री रामेश्वर विद्यामंदिर एडगाव नं 1 या शाळेची विद्यार्थिनी ज्ञानदा खुळपे (इयत्ता चौथी) हिने वैभववाडी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी इयत्ता चौथी व सातवीच्या जिल्हा परिषद शाळांतील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात येते. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. तसेच ज्ञानदा हीने आय एम विनर परीक्षेमध्ये राज्यात सहावा क्रमांक व संदेश युवा प्रतिष्ठान आयोजित एसटीएस परीक्षेमध्ये वैभववाडी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. ज्ञानदाने यापूर्वीही रोटरी क्लब ऑफ वैभववाडी आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये व माधवराव पवार विद्यालय आयोजित चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. या परीक्षेकरिता तिला शाळेचे शिक्षक चेतन बोडेकर, दीप्ती पाटील, सारिका सासणे व पालक यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल तिचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रताप रावराणे, केंद्रप्रमुख रामचंद्र जाधव, विस्तार अधिकारी अशोक वडर व गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.