धामणी-घेरापालगडमध्ये २६ रोजी चैत्रावली उत्सव

खेड(प्रतिनिधी)
तालुक्यातील धामणी-घेरा पालगड येथे श्री झालाई देवी मंदिर ट्रस्ट वतीने २६ एप्रिल रोजी चैत्रावली उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त विविधांगी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू राहणार आहे.
सकाळी ९ वाजता देवीची रूपे व पालखी सजवणे, दुपारी १२ वाजता मंदिरातील दैवतांना परंपरेनुसार मानविणे व नैवेद्याचा प्रसाद सायंकाळी ७ वाजता पालखी नाचवणे, रात्री ८ वाजता महाप्रसाद, रात्री ९.३० वाजता सत्कार समारंभ होईल, रात्री १० वाजता देवरूख येथील श्री सह्याद्री मालेश्वर नमन कलामंच पाटगाव यांचा शेषनागाचे गर्वहरण हे गणनाट्य व ओवाळीते भाऊराया अर्थात पाटराखिन  हे वगनाट्य होईल.
याप्रसंगी मुंबई समितीचे अध्यक्ष यशवंत कदम, सचिव जगदीश शिंदे, खजिनदार अनिल कोरपे, ग्रामीण समितीचे अध्यक्ष सुधीर कदम, सचिव पंकज कदम, खजिनदार अमोल भोसले आदी उपस्थित राहणार आहेत. भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.