श्री काडसिद्धेश्वर अध्यात्मिक केंद्र कोचरी बेंद्रेवाडी यांच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

लांजा, (प्रतिनिधी) तालुक्यातील कोचरी बेंद्रेवाडी येथील श्री काडसिद्धेश्वर अध्यात्मिक केंद्र यांचा ५० व्या सुवर्ण महोत्सवी निमित्त दि.०७ मे ते १० मे २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

या कार्यक्रमांतर्गत सकाळी ६.०० वाजता काकड आरती त्यानंतर ९.०० वाजता सकाळचे भजन सायंकाळी ४.०० वाजता सांप्रदायिक भजन असा दिनक्रम असून मंगळवार दि.०७ मे रोजी सकाळी १०.०० वाजता क्रिकेट स्पर्धा ( वाडी मर्यादित) सायं-६.०० वा.हरिजागर आणि किर्तन(किर्तनकार श्री.चंद्रकांत पवार महाराज),लांजा यांचे किर्तन,रात्रौ-९.०० वाजता आरती व शेजारती त्यानंतर ९.३० वा. महाप्रसाद व तद्नंतर १०.वाजता बैठी भजन-श्री काडसिद्धेश्वर सांप्रदाय भजन मंडळ,देवरुख यांचे भजन असे कार्यक्रम होतील. बुधवार दि.०८ मे रोजी सकाळी १२.०० ते.२.०० या कालावधीत हळदीकुंकू, सायं-५.०० वाजता गुणगौरव व सत्कार समारंभ(गुणगौरव गावपातळीवर हायस्कूल व मराठी शाळेतील मुलांचा सत्कार)(सत्कार समारंभ वाडीतील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार)रात्रौ ८.३० वाजता आरती व शेजारती रात्रौ.९.०० वाजता महाप्रसाद व तद्नंतर रात्रौ १०.०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होतील.

 

गुरुवार दि.०९ मे रोजी सायं-४.००वाजता पालखी मिरवणूक, किर्तन(किर्तनकार श्री.नामे बुवा),रात्रौ-९.०० वाजता महाप्रसाद व तद्नंतर रात्रौ १०.०० वाजता बैठी भजन(तिवरे मेढे भजन मंडळ. शुक्रवार दि.१० मे रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत श्री काडसिद्धेश्वर आध्यत्मिक केंद्र,कोचरी,बेंद्रेवाडी संलग्न सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिचर्स सेंटर कणेरी मठ,कोल्हापूर आयोजित मोफत आरोग्य शिबीर असून यामध्ये रक्तदान,हाडांचे आजार तपासणी,डोळे तपासणी,ईसीजी,शुगर तपासणी वैद्यकीय सल्ला यांचा समावेश आहे, सायं-५.०० वाजता पालखी रिंगण भजन,सायं-६.३० वाजता दिप प्रज्वलन व सायंकाळी ७.०० वाजता प.पूज्य श्री समर्थ सद्गुरु अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांचा प्रवचन सोहळा आयोजित केला आहे तद्नंतर रात्रौ १०.०० वाजता महाप्रसाद अशा प्रकारे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.

तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहून आनंद द्विगुणित करावा,असे आवाहन श्री काडसिद्धेश्वर आध्यात्मिक केंद्र,कोचरी बेंद्रेवाडी,लांजा यांच्या तर्फे करण्यात आले आहे.