चौपदरीकरणासाठी वृक्षांच्या कत्तलीचा परिणाम,
खेड(प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरण कामासाठी दुतर्फा असलेल्या नैसर्गिक झाडांची कत्तल करण्यात आल्याने महामार्ग भकास झाला आहे महामार्गावरील हिरवळ जणू काही गायबच झाली आहे. सद्यस्थितीत तापमान ४२ अंशावर पोहोचले आहे. उन्हाच्या काहिलीने हैराण झालेले वाहनचालक आता सावली शोधत आहेत. चौपदरीकरणासाठी दुतर्फा करण्यात आलेल्या झाडांच्या कलीमुळे रस्त्यालगत सावली शोधूनही सापडत नसल्याने वाहनचालकांना रणरणत्या उन्हातूनच मार्गस्थ व्हावे लागत आहे.
उन्हाळी सुट्टी हंगामासह लग्नसराई व जत्रोत्सवामुळे चाकरमानी गावी डेरेदाखल होत असल्याने वाहनांच्या रेल चेलीने महामार्ग गजबजला आहे. महामार्गावर दिवस-रात्र हजारो वाहने धावत असतात सद्यस्थितीत वाहनांची संख्या बेसुमार झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आधीच उन्हाच्या चटक्यांनी सारेजण हवालदिल झाले असतानाच महामार्गावरून धावणाऱ्या वाहनचालकांनाही रखरखत्या उन्हाची झळ बसत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामास प्रारंभ झाल्यानंतर सर्वप्रथम रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जुनाट नैसर्गिक झाडांची कसत करण्यात आती महामार्गावर दुतर्फा असलेल्या नैसर्गिक झाडांची संख्याही तितकीच होती. महामार्गावर काही ठिकाणी १५० हून अधिक जुनाट वृक्षही होते. या पटवृक्षाखाली ये-जा करणारे वाहनचालक क्षणभर सावलीखाली विसावा घेऊन पुढील प्रवासाला निघत होते. मात्र, चौपदरीकरणासाठी महामार्गावर दुतर्फा असलेल्या सर्वच झाडांची कतन करण्यात आल्याने महामार्ग परिसर ओसाड झाला आहे. महामार्गावर झाडाची सावलीच नष्ट झाली आहे










