खेड(प्रतिनिधी) खेड बसस्थानकातील ९ पंखे बंदच असल्याने प्रवासी उष्म्याने हैराण होत आहेत. बंदावस्थेतील पंख्याकडे लक्ष देण्यास एसटी प्रशासनाला सवड मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बसस्थानकातील बंदावस्थेतील पंख्यांची भर पडली आहे. दुपारच्या सुमारास प्रचंड उष्याच्या काहिलीत घशाला कोरड पडत असल्याने त्रस्त होणारे प्रवासी थंडपेयांचा आधार घेत आहेत. मात्र एसटी प्रशासन बसस्थानकातील पंखे चालू करण्याची तसदीच घेत नसल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.
बसस्थानकात ९ जुनाट पंखे असून बसस्थानकातील पोलीस चौकीत १ नवीन पंखा बसवण्यात आला आहे. याबाबत वाहतूक नियंत्रण कक्षात विचारणा करणाऱ्या प्रवाशांना थातूरमातूर उत्तरे देवून बोळवण केली जात आहे. यामुळे येथील एसटी प्रशासन प्रवाशांच्या सेवेसाठी की ‘गैरसोयी’साठी अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
उन्हाळी सुट्टीसह लग्नसराईमुळे चाकरमान्यांच्या वर्दळीसह येथील बसस्थानक पुरते गजबजले आहे. आधीच लांबपल्ल्यासह ग्रामीण भागात उशिराने मार्गस्थ होणाऱ्या बसफे यांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत








