गुहागर | प्रतिनिधी
गुहागर तालुक्यातील वरचापाठ मोहल्ला येथून इब्राहिम माहीमकर यांच्या मालकीची मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर कार गाडी क्रमांक एम एच ०५ ए बी ५४७५ या क्रमांकाची गाडी त्यांच्या घराजवळ उभी असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या गाडीची किंमत ७० हजार रुपये असल्याचे त्यांनी तक्रारीत सांगितले आहे. हा प्रकार २६ रोजी रात्री २३. २० ते २७ रोजी सकाळी ८ वा.च्या सुमारास घडला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या बाबतची तक्रार त्यांनी दिनांक २९ रोजी गुहागर पोलीस स्थानकात नोंदविली. भा. दं. वि कलम ३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास गुहागर पोलीस करीत आहेत. गुहागरमध्ये गेल्या महिन्यांमध्ये अनेक चोरींचे प्रकार घडले असून पोलिसांसमोर मोठे आव्हानच उभे राहिले आहे.











