पुणे विभागाचे विभागप्रमुख डॉ.के.एस.होसाळीकर यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, रविवार ९ जून ते मंगळवार ११ जूनपर्यंत कोकणातील काही भागांत मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेत या कालावधीत रत्नागिरी, रायगड, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे याठिकाणीही पावसाचा अंदाज (Heavy rain forecast) देण्यात आला आहे., अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
९ जून ते ११ जून दरम्यान या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’
भारतीय हवामान विभागाने काल दिलेल्या अपडेटनुसार, पुढील 3 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा जारी केला होता. यामध्ये ९ जून ते ११ जून दरम्यान अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान खालील जिल्ह्यांमध्ये अति-मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- रविवार, 9 जून- कोल्हापूर, सिंधुदुर्ग
- सोमवार, 10 जून- कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी
- मंगळवार, 11 जून-कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा












